Select Page

ग्रंथराज दासबोध ओवीसार

“आत्माराम दासबोध |  माझें स्वरूप स्वत:सिद्ध |असता न करावा खेद | भक्तजनी ||”

श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी लिहिलेला दासबोध म्हणजे महाराष्ट्र व भारतचे वैभव आहे,आणि तो त्यांनी दिलेला प्रसादाच आहे. जनसामान्यांची त्यांना लागलेली तळमळ, त्यांच्या उद्धारासाठी केलेली सामाजिक जागरुकता, राजकारण, देवकारण व धर्मकारण या सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास त्यांनी त्या काळात घडवून आणला.

श्रीसमर्थांनी आपल्या एकूण त्र्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पंचेचाळीस हजार ओव्या भरतील इतके वेगवेगळे  साहित्य लिहिले आहे. साहित्यातून, कीर्तनातून, मठनिर्मितीतून, महंत तयार करून राष्ट्रंजागृती केली.

श्रीसमर्थांनी “दासबोध” ‘शहाणे करून सोडावे सकळ जन…..’ या हेतूने एक एक समास त्यांना अपेक्षित असलेल्या विषयाशी जोडलेला आहे. प्रत्येक समास एकमेकास पूरक आहेत.

शांत चित्ताने दासबोध वाचला तर पहिल्याच समासात श्रीसमर्थ म्हणतात “श्रवण केलियाचे फळ l  क्रिया पालटे तात्काळ” कारण श्रीरामाने रामदास स्वामिना केलेला हा उपदेश आहे. तोच उपदेश दासबोध रूपाने श्रीसमर्थ आपणास करतात तो आपला उद्धार करण्यासाठी. 

या ग्रंथात भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक, मोक्ष या सर्व गोष्टी सांगितल्या तरी नाम घेणे किती म्हत्वाचे आहे ते पण सांगितले तरच आपण सन्मार्गाला लागू व भगवंत प्राप्ती होईल.

ग्रंथराज दासबोधातील  यापुढे दररोज एका ओवीचा-सार आपण पाहणार आहोत. प्रत्येक समासातील दोन ओव्या पाहू. जेणेकरून समासाचा आशय लक्षात येईल.

– ज्योती कोरबू-सांगली

ओव्यांचे अंतरंग

मॅनेजमेन्ट गुरू असणाऱ्या दासबोध ग्रंथाचा प्रचार व प्रसारासाठी दासबोध ओवीसार या नावाने स्वतंत्र ब्लॅाग (लिंक ) तयार केला आहे. या ब्लॅाग मधे रोज एका ओवीचे थोडक्यात विवेचन होणार आहे.
ही लिंक पहा, सबस्क्राइब करा, लाईक करा म्हणजे पुढची माहिती लगेच मिळेल. आपल्याला श्रीसमर्थ विचार घरोघरी पोचवायचे आहेत. काही प्रतिक्रिया असतील त्या पण शेअर करां आणि जास्तीत जास्त लोकांन पर्यंत हे पोचवा.

तरुणांनी टाईम मॅनेजमेंट, गोल सेटिंग, टॉकिंग स्किल, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इन्नर पीस, हॅप्पी लाईफ,इंटरविव्ह स्किल, स्टेज परफॉरन्स, ग्रुप डिस्कशन, सोशल मॅनर्स, सोशल मॅनेजमेंट, जनरल व स्पेशल मॅनेजमेंट स्किल्स इत्यादी व्यक्तिमत्त्व विकासाच्या मुद्द्यां साठी यातील निवडक ओविंचा अभ्यास करावा ही अपेक्षा..